नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथील एका तरुणाने एकाच वेळी चार तरुणींना डेट केलं. मात्र जेव्हा या तरुणींना या तरुणाची करामत माहित पडली तेव्हा त्या चौघींनी सुद्धा एकत्र येत या तरुणाच्या घराबाहेर गोंधळ घातला. त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळामुळे आणि बदनामीच्या भीतीने या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या या तरूणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारा हा तरुण आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या चारही प्रेयसी तिथे होत्या. या चौघींनाही तो एकाच वेळी डेट करत होता. चारही तरुणींना जेव्हा याची कल्पना आली तेव्हा त्यांनी थेट तरुणाचं घऱ गाठलं. यानंतर तरुणींना त्याला जाब विचारण्यास सुरुवात केला. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता.
प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच तरुणाने घरात धाव घेतली आणि विष प्यायला. यानंतर शेजाऱ्यांनी तरुणाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. तिथे त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं. तरुणाची प्रकृती सध्या गंभीर आहे. दुसरीकडे तरुणींनी कोणतीही तक्रार दिली नसल्याने पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही.