पारोळा (प्रतिनिधी) बनावट पाचशेच्या नोटा खऱ्या असल्याचे भासवून बॅंकेत सीडीएम मशिनद्वारे जमा करणा-या एकाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु आत्माराम पाटील (रा. चोरवड)असे संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राजु पाटील हा त्याच्याकडील बनावट पाचशे रुपये दराच्या सहा नोटा एचडीएफसी बँकेच्या सीडीएम मशिनद्वारे जमा करत होता. परंतू मशिनच्या माध्यमातून तपासल्या असता त्या नोटा बनावट आढळून आल्या. या प्रकरणी जिंतेंद्र किशोर खरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक योगेश जाधव करत आहेत.