लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पंचायतीनं फर्मान काढल्यानंतर एका अल्पवयीन प्रेमीयुगलाच्या तोंड काळं करून, गळ्यात चपलांची हार घालून संपूर्ण गावात फिरवण्यात आलं. पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा केला असून पाच जणांना अटक केली आहे.
गौर ठाणे परिक्षेत्रातील एका गावात दलित अल्पवयीन युवक युवतीला चपलांची माळा घालून, तोंडावर काळ फासून लोकांनी गावातून फिरवले. पोलिसांनी हे प्रकरण अधिक गंभीरतेनं घेतलं असून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी आत्तापर्यंत ५ जणांना अटकही करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन जोडपं आपत्तीजनक अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आलं होतं. त्यामुळे, गावकऱ्यांनी त्यांना गाव पंचायतीसमोर उभे केलं. गाव पंचायतीने त्यांना ही मानवतेला काळीमा फासणारी शिक्षा सुनावली.
दरम्यान, पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, उच्चसुशिक्षित आणि जागरुक नागरिकांवरही प्रश्न विचारला जात आहे. अजूनही गाव-खेड्यात सुरू असलेल्या खाप पंचायतींच्या हुकमशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
















