जळगाव (प्रतिनिधी) खाजगी द्वेषातून चार विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्याचा आरोप पालकाने केला आहे. याबाबत पालकांनी जिल्हाधिकारी, शिक्षण अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणी तक्रारी केल्या आहेत.
या संदर्भात अधिक असे की, शेख नुरुद्दीन अब्दुल गफ्फार हे हाजी एन.एम. सैय्यद उर्दू हायस्कूल कासोदा या शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवारत आहेत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जळगाव येथे त्यांचे प्रवेश स्थानिक शाळेत घेतले होते. एक मुलगी नामे आयशा सिद्दीका शेख नुरुद्दीन ही बी. एम. जैन उर्दू प्रायमरी स्कूल प्रतापनगर, जळगाव येथे इ. ४ थीत तर दुसरी मुलगी रिमशा फातेमा शेख नुरुद्दीन ही इ ९ वी त इकरा उर्दू हायस्कूल सालारनगर जळगाव येथे शिक्षण घेत आहे.
तसेच भावाचा मुलगा नाम मोहम्मद फैजान मोहम्मद सादिक हा इ. ५ वीत तर मोहम्मद सुफियान मोहम्मद सादिक हा इ. ८ वीत. तर माझी मुलगी नामे रिमशा फातेमा शेख नुरुद्दीन ही इ. ९ वीत इकरा उर्दू हायस्कूल सालारनगर जळगाव येथे शिक्षण घेत होते. या शाळांचे मुख्याध्यापक शेख आबिद व डॉ. शेख हारुन बशीर यांनी खाजगी द्वेषापोटी त्यांच्या स्कूल लिव्हींग सर्टिफिकेट रजि.पोष्टाने सरळ घरात पाठवून त्यांची नावे शाळेतून काढून टाकत आमच्या मुलांचे शिक्षण थांबविल्याचा आरोप शेख नुरुद्दीन अब्दुल गफ्फार यांनी केला आहे.
विद्यार्थी मुली व मुले हे अनुक्रमे १०, ११, १४ व १५ वर्षांची आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधि. २००९ नुसार त्यांना कायद्याने प्राथमिक शिक्षण त्यांच्या मर्जीच्या शाळेत पूर्ण करुन घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्याही शाळेचा मुख्याध्यापक अशा बेकायदेशीरपणे त्यांची नावे कोणत्याच कारणामुळे बालकाच्या व पालकाच्या संमती व मागणी शिवाय शाळेतून काढूच शकत नाही. अगदी असे करणे कायद्याने गुन्हा असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आमच्या मुलांची नावे शाळेतून काढून टाकल्यावर याचा विपरीत परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच जळगाव शहरात उर्दू माध्यमाच्या जवळपास सर्व शाळा त्यांच्याच ताब्यात असल्याने आमच्या मुलांना शहरातील कोणत्याही उर्दू शाळेत प्रवेश मिळणार नाही याची देखील आम्हाला भीती असल्याचेही तक्रारदार शेख नुरुद्दीन अब्दुल गफ्फार यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत इकरा विद्यालयाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. तर इकरा संस्थेची प्रतिक्रिया आल्यावर प्रकाशित करण्यात येईल.
















