मुझफ्फरनगर (वृत्तसंस्था) एका व्यक्तीने पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील नई मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन अल्पवयीन मुलांसह 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडितेने पोलिसांत फिर्याद दिली आहे की, काल ती तिच्या माहेरी पतीसह सासरच्या घराकडून परतत असताना वाटेत दहा जणांनी तिला अडवून आंब्याच्या बागेत नेले. सहा जणांनी तिच्या पतीला बागेतल्या झाडाला बांधून चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. विजयवर्गीय यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली असून दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे. एसएचओ पंकज पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा जबाब लवकरच न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला जाईल. पोलिस अधीक्षक (शहर) अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह दहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.















