उल्हासनगर (वृत्तसंस्था) एका २७ वर्षीय जावयाने आपल्या ४५ वर्षीय सासूवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लग्नापूर्वी जावयाचं सासूवर प्रेम जडलं होतं. परंतू लग्न करणं शक्य नसल्यामुळे आरोपीने पीडित सासूच्या मुलीला लग्नाची मागणी घातली. २०१८ साली आरोपी आणि पीडित सासूच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. यानंतर जावई आणि सासूमधले प्रेमसंबंध वाढायला लागले. काही महिन्यांनी जावयाने गोड-गोड बोलून सासुसोबत शारिरिरक संबंध प्रस्थापित केले. काही वर्षांनी जावई आणि सासूमध्ये काहीतरी घडत असल्याची कुणकुण घरच्यांना लागली होती. काही दिवसांनी दोघांमधली प्रेमप्रकरणाचं बिंग फुटल्यानंतर सासूने जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित सासू ही हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर जावईही उल्हासनगरमध्येच राहतो.