श्योपूर (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला लाज आणेल असा प्रकार समोर आला आहे. हैवान पित्याने आपल्याच २० वर्षीय विवाहित मुलीला वासनेचा बळी बनवून बलात्काराची घटना घडवली. पीडित विवाहित मुलगी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आपल्या माहेरी आली होती. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) करत नराधम बापाला अटक (Accused Father arrested) केली आहे.
संबंधित घटना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्याच्या विजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित विवाहित मुलगी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आपल्या माहेरी आली होती. तर पीडित मुलीची आई मकरसंक्रांतीसाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे माहेरी आलेली पीडित मुलगी आपल्या बहीण-भावांसह वडिलांसोबत राहत होती.
दरम्यान, घटनेच्या दिवशी रात्री उशिरा नराधम बापाच्या डोक्यात वासनेचं भूत शिरलं. त्यानं गाढ झोपी गेलेल्या आपल्या पोटच्या लेकीसोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. यावेळी अचानक जाग आल्यानंतर पीडित मुलीनं बापाच्या या कृत्याला विरोध केला. पण नराधम बापाने विकृतीच्या परिसीमा गाठत आपल्याच पोटच्या मुलीवर अमानुषपणे बलात्कार केला आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीनं आपल्या आईसह विजयपूर पोलीस ठाण्यात जाऊन बापाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास विजयपूर पोलीस करत आहे.