भडगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीसोबत लग्न करत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. यानंतर पिडीत मुलीने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी भडगाव पोलिसात एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, सन २०२१ मध्ये भडगाव तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने एका १२ वर्षीय मुलीसोबत कोणास काही एक न सांगता मंदिरात जाऊन लग्न केले. तसेच तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. यातून पिडीता गरोदर राहिली. त्यानंतर २०२२ मध्ये पिडीतेने एका मुलास जन्म दिला. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून बालविवाह प्रतिबंध,पोस्को आणि बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो उप निरी गणेश वाघमारे हे करीत आहेत.