फैजपूर (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा चुलत दिराने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ७ एप्रिल २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास चुलत असणाऱ्या तरुणाने अर्धनग्न अवस्थेत २५ वर्षीय महिलेच्या बेडरूममध्ये प्रवेश करत मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. विकास सुरेश सोनवणे हे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी असणाऱ्या चुलत दीराला अटक करण्यात आली आहे.