पुणे (वृत्तसंस्था) घोरपडी परीसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एका तरुणाने घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून गुन्हा दाखल होताच पसार झाला आहे. आरोपीने मुलीला अश्लील शब्दांत बोलून तिच्या गुप्तांगावर लाथ मारली. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल सुलतान शेख असं गुन्ह दाखल झालेल्या ५८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास नराधम आरोपीनं १२ वर्षीय पीडित मुलीला अश्लील शब्दात शिवीगाळ केली आहे. आरोपीनं पीडितेला ‘तेरे कपडे उतारके नंगा करूंगा’ अशा शब्दात अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आहे. नराधम आरोपी एवढ्या वरच थांबला नाही. तर त्याने पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारून तिला जखमी केलं आहे.
ही संतापजनक घटना समोर येताच पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करताच, आरोपी फरार झाला आहे. आरोपी आदिल हा सराईत गुन्हेगार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
















