पारोळा (प्रतिनिधी) एका २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात मुकेश राहुल जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १७ मे २०२२ ते दिनांक २८ मे २०२२ पावेतो वेळोवेळी मुकेश राहुल जाधव (वय २५ ) याने २७ वर्षीय तरुणीचा विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखविले. तसेच तरुणीला पळवून नेऊन मर्जी विरोधात वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्थानकात मुकेश राहुल जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत.
















