चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिली. याप्रकरणी २२ वर्षीय संशयित आरोपी विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात आपल्या आई वडील व भावासह वास्तव्यास असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपी राकेश युवराज जिरे(वय २२) याने लग्नाचे आमिष दाखवले. माझ्याशी लग्न कर म्हणत संशयित आरोपी पिडीत मुलीच्या मागे सतत फिरत असायचा. तसेच तिच्याकडे एकटक बघून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करायचा. एवढेच नव्हे तर, तुझ्या आई वडिलांना व भावाला जीवे ठार मारेल अशी धमकी देत पिडीत मुलीवर वारंवार अत्याचार केला. यातून पिडीतेला गर्भधारणा झाली. या प्रकरणी संशयित आरोपी राकेश युवराज जिरे (वय २२) याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि धरमसिंग सूदरडे हे करीत आहेत.