पुणे (वृत्तसंस्था) मित्राने तरुणीच्या घरी येऊन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही तर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी नदीम बाबु शेख (वय ३२, रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मुंढवा येथील केशवनगरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे. सप्टेबरमध्ये आरोपी फिर्यादीच्या घरी आला होता. त्याने गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाली असताना तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकारानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. १० ऑक्टोबर रोजी तो पुन्हा तिच्या घरी आला. त्याने १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार शरीसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. हे समजल्यावर त्याने तिला शिवीगाळ करुन लग्न न करण्याची धमकी दिली. तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.