परभणी (वृत्तसंस्था) लग्न समारंभासाठी मागवलेल्या बँड पथकामध्ये गाणं म्हणत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीतून (Parbhani) समोर आली आहे. ही महिला गाणं गात असताना कोसळल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
सदरची घटना परभणी जिल्ह्यातील असून ती मागील शुक्रवारी घडली आहे. एका लग्नसोहळ्यात गाणं म्हणत असतांना हृदयविकारचा तीव्र झटका आल्याने होमगार्ड महिलेचा मृत्यू झाला. संगीता गव्हाणे अस मृत महिलेचा नाव आहे. संगीता या लग्नातील बँडमध्ये गाणं गात होत्या त्यावेळी त्या अचानाक खाली पडताना व्हिडीओमध्ये दिसतं आहेत. त्या खाली कोसळतानाचा सर्व प्रकार एका कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या घटनेनंतर संगिता यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, याआधी लग्न समारंभात लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचत असताना एक तरुण अचानक बेशुद्ध झाला आणि जमीनीवर पडला. त्यामुळे उपस्थित लोकांनी त्याला जिल्ह्याच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही घटना मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात घडली होती. त्यामुळे लग्न कार्यामध्ये नाचताना, गाताना स्वत:ची काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनांमधून समोर येत आहे.