जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोलाणे येथे भाऊबिजेच्या दिवशी सोमवारी सायंकाळी बहिण-भावाने विषारी पदार्थ प्राशन केल्याची घटना घडली. यात बहिणीचा मृत्यू झाला तर, भावावर उपचार सुरु आहेत.
तालुक्यातील भोलाणे येथे राहणारे विश्वजित विजय सपकाळे (वय-२१) आणि अश्विता विजय सपकाळे (वय-१८) हे दोन्ही भाऊबहिण मुंबई येथे उच्चशिक्षण व नोकरी करत होते. परंतू लॉकडाऊनमुळे दोघे बहिणभाऊ भोलाणे येथे परत आले होते व घरीच बसून काम व अभ्यास करत होते. परंतू सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दोघांनी एकामागून एक विषारी औषध प्राशन केले. दोघांनी नेमकं विषारी औषध प्राशन का केले?, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दोघांना अत्यवस्थ पाहून नातेवाईकांना तातडीने जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात हलविले. परंतू अश्विताचा रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रस्त्याच मृत्यू झाला. दुसरीकडे विश्वजित याला अत्यवस्थ अवस्थेत खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे वृत्त आहे.
















