हैदराबाद (वृत्तसंस्था) एका सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाला काळ्या जादूच्या संशयातून खुर्चीला बांधून जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. या प्रकरणी पत्नीसह सासरकडील सहा ते सात जणांना अटक करण्यात आली आहे. पवन कुमार (वय-) असे मृताचे नाव आहे.
पवन कुमार जादूटोणा करत असल्याचा संशय त्यांना होता. त्याची पत्नी कृष्णावेनीचा भाऊ जगन याचा १२ दिवसांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला पवन कारणीभूत असल्याचा संशय त्यांना होता. कोणत्या तरी कारणावरून पवन आणि सासरच्या मंडळींमध्ये वाद झाला होता. त्यावेळी पवनने जगनला ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून उघड झाली आहे. जादूटोणा करून पवन आपल्याला इजा पोहोचवणार असल्याचा संशय जगनच्या पत्नीला होता. जगनच्या मृत्यूनंतर त्याची पवननेच हत्या केल्याचा संशय तिने व्यक्त केला होता. पवनची पत्नी कृष्णावेणीला सुद्धा अटक करण्यात आली आहे. तिने वहिनी रापार्थी सुमालाथावर आरोप केला आहे. वहिनीने आपल्या नवऱ्याला जाळून मारले, असा तिचा आरोप आहे. १२ दिवसांपूर्वीच पवनचा मेहुणा जगनचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पवनने काळी जादू केल्यामुळे हे सर्व घडले, असा पत्नीच्या नातेवाईकांच्या मनात संशय होता. त्यामुळे त्यांनी पद्धतशीरपणे कट रचून पवनची हत्या केली असे पोलिसांनी सांगितले.