जळगाव (प्रतिनिधी) ट्रान्सपोर्टचा व्यावसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी घेतांना एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत महिलेसह एका वकिलाला अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५५ वर्षीय व्यावसायिक वास्तव्याला आहे. एकाच्या माध्यमातून वकील उखा राठोड यांची व्यावसायिकासोबत ओळख निर्माण झाली, त्या वकीलाने वेश्या व्यावसाय करणाऱ्या एका महिलेची ओळख व्यावसायिक यांच्याशी करून दिली. त्यामुळे महिलेशी ओळख निर्माण झाल्यानंतर दोघांच्या सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्याच्या मोबदल्यात महिलेला वेळोवेळी पैसेही देण्यात आले होते. दरम्यान, महिलेने दरवेळी व्यावसायिकाला काहीना काही कारणासाठी फोन करून पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली.
भीतीपोटी व्यावसायिकाने आतापर्यंत ७१ हजार ५०० आणि महिलेची ओळख करून देणारा वकील उखा राठोड याला १५ हजार रूपये दिलेत. त्यानंतर महिलेने पुन्हा फोन करून पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तिला समजविण्याचा प्रयत्न केला परंतू ती समजण्याच्या मानसिकेतेत नव्हती. त्यानंतर तीन पाच लाखांची मागणी केली. त्यावेळी व्यावसायिक यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने धमकी दिली, तू जर मला पैसे दिले नाही तर तुझ्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करेल तसेच माझी मुलीवर देखील बलात्काराचा केल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्याची धमकी दिली.
दरम्यान, समाजात आपली बदनामी होईल या भितीने व्याावसायिकाने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी महिलेसह वकीलाच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आयोध्या नगरात सापळा रचून तिला १ लाख रूपयांची रोकड आणि ४ लाख रूपयाचे चेक घेतांना महिलेसह वकील राठोड याला अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता महिलेसह वकील राठोड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस अधिकारी हे करीत आहे.