वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेतील इंडियानापोलीस शहरात झालेल्या गोळीबारात शीख समुदायातील चौघा जणांचा मृत्यू झाला. फेडेक्स फॅसिलिटीबाहेर गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. ८ जणांची निर्दयी हत्या केलेल्या १९ वर्षीय आरोपीनं स्वतः वरही गोळी झाडली आहे.
इंडियाना राज्यातील संबंधित फेडेक्स सेंटरमध्ये डिलिव्हरी सेवा देण्याचं काम करणाऱ्या लोकांमध्ये ९० टक्के लोकं भारतीय- अमेरिकन आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी स्थानिक शीख समुदायातील आहेत. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना, शीख समुदायाचे नेते गुरिंदर सिंह खालसा यांनी म्हटलं की, ‘ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून संपूर्ण शीख समुदाय दुःखात आहे.
संबंधित हल्लेखोर आरोपी ब्रॅंडन स्कॉट पूर्वी फेडेक्सच्या सेंटरमध्ये काम करत होता. मॅरियन काउंटी कोरोनरच्या कार्यालयानं मृतांची ओळख पटवली असून मृत झालेल्या लोकांची नाव- ३२ वर्षीय मॅथ्यू आर. अलेक्झांडर, १९ वर्षीय सामरिया ब्लॅकवेल, ६६ वर्षीय अमरजीत जोहल, ६४ वर्षीय जसविंदर कौर, ६८ वर्षीय जसविंदर सिंह, ४८ वर्षीय अमरजीत सेखों, १९ वर्षीय करली स्मिथ आणि ७४ वर्षीय जॉन वीसर्ट अशी आहेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, या संबंधित गोळीबाराच्या घटनेची माहिती मला मिळाली आहे. अंधाधुन केलेल्या या गोळीबाराच्या हिंसाचाराला त्यांनी एक महामारी संबोधलं आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटलं की, ‘बंदुकीतून केलेल्या गोळाबारात अनेक अमेरिकन नागरिकांचा दररोज जीव जात आहेत. यामुळे आपल्या देशाची प्रतिमा कलंकित होतं होतं. अशा प्रकारच्या घटना देशाच्या आत्म्यावर हल्ला करतात, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.