जळगाव (प्रतिनिधी) शासनाचा विशेष लेखा परिक्षक असल्याचे सागून शहरातील सोनी डायफुट व जनरल दुकानदाराची ४३ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कैलास फकिरा बिरारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अजय रतनसी सोनी (रा. प्लॉट नं. १९७ सि. ११८०, दुकान नं. ०१रसाळ चेबर्स, लेवा बोर्डिंगसमोर जिल्हा पेठ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कैलास फकिरा बिरारे (रा. रमेश इंडस्ट्रीज पोखरण रोड ठाणे) याने अजय रतनसी सोनी यांचे सोनी डायफुट व जनरल दुकान नं. ०१रसाळ चेबर्स जळगाव याठिकाणी येवून मी शासनाचा विशेष लेखा परिक्षक या पदावर आहे. असे सागुन व आय कार्ड दाखवुन अजय सोनी यांचा विश्वास संपादन केला. तसेच अजय यांच्याकडून २० किलो काजु, २० किलो बदाम, २० किलो गायीचे गावरान तुप खरेदी करुन पक्के बिल नुसार ४३,००० रुपयांचा माल घेतला व पैसे न देता टी जे एस बी सहकारी बँक लि या बॅके चा चेक क्र ५३३२११ दि ०७/०३/२०१८ रोजीचा असा ४३,०००/- चेक दिला. तो बॅकेत न वटल्याने मी चेक परत करुन आज पावेतो वेळोवेळी त्यास फोन वर संपर्क करुन पैसे देणेबाबत सागीतले असता त्याने आज पावेतो न दिल्याने फसवणूक झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कैलास फकिरा बिरारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ महेंद्र बागुल करीत आहेत.