जळगाव (प्रतिनिधी) श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९७ वी जयंती श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने संताजी महाराजांचे मूर्ती पूजन करण्यात आले.
आमदार राजू मामा भोळे यांनी संताजी महाराजांनी समाज उभारणीचे कार्य केले असून त्यांनी दिलेली शिकवण ही प्रेरणादायी आहे समाज बांधवांनी नेहमी सकारात्मक भावनेने कार्य करीत रहावे असे गौरवोद्गार आपल्या भाषणात काढले तर महापौर जयश्री महाजन यांनी तेली समाज बांधवांना संताजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संताजी महाराजाचे यामध्ये मोठे योगदान आहे, त्यांनी समाजाला दिलेली दिशा समाजात रुजण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे आपल्या भाषणात सांगितले.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस जळगावचे प्रथम नागरिक महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे, शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सुनंदाताई चौधरी, सुषमा चौधरी, नगरसेवक प्रवीण कोल्हे, नगरसेवक संजय चौधरी, विठोबा माजी नगरसेवक दिगंबर चौधरी, दत्तात्रय चौधरी, नगरसेवक महेश चौधरी, संताजी जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी, प्रकाश चौधरी, उमेश चौधरी, अशोक चौधरी, संदीप चौधरी, सुभाष चौधरी, देविदास चौधरी, सुभाष चौधरी, बीएम दत्तात्रेय चौधरी, दिलीप चौधरी, विकास महाले, जे बी चौधरी, मनोहर चौधरी, छोटू किरण चौधरी, अमोल चौधरी, चंद्रकांत चौधरी, व्ही आर पाटील, यशवंत चौधरी, अशोक चौधरी, दुर्गेश चौधरी, डॉ. पोपट चौधरी, कैलास चौधरी, प्रकाश चौधरी, रवींद्र चौधरी, विशाल पाटील, पांडुरंग चौधरी, आनंद चौधरी, सुनील चौधरी, दर्शन चौधरी, योगिराज चौधरी, कमलेश चौधरी व सर्व समाज बांधव व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.