धरणगाव (प्रतिनिधी) येथील भास्कर भिका रायपूरकर यांच्या सेवापूर्ती निमित्ताने दि. २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान येथील स्वामी समर्थ नगर येथे श्रीमद भागवत कथा महोत्सवाचे आयोजन झाले. हभप राया उपासनी (निजामपूरकर) यांनी भागवत कथेचे निरुपण केले. याप्रसंगी निरूपण करतांना आपल्या जीवन रूपी रथाचे सारथ्य परमेश्वराच्या हाती द्या, जीवन आनंदी होईल असे प्रतिपादन केले.
आज महामंडलेश्वर भगवानदास महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन भागवत कथेची समाप्ती झाली. समाप्ती प्रसंगी चिंतामण मोरया मंदिरापासून टाळमृदुंगाचा गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन केले. भक्ती रसात तल्लीन होऊन ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करत ठेका धरला. यासाठी पंचक्रोशीतील बंधू-भगिनी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भागवत कथेचे आयोजन मनोज रायपूरकर, कन्हैया रायपूरकर, डिगंबर रायपूरकर यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी येथील गजानन महाराज प्रतिष्ठान व वारकरी शिक्षण संस्था यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वामी समर्थ नगर रहिवासी आणि पंचक्रोशीतील भक्तगण, महिला, तरुण मंडळी यांनी परिश्रम घेतले.
















