धरणगाव (प्रतिनिधी) येथील विकल्प ऑर्गनायझेशन च्या वतीने पारोळा नगरपरिषद येथे शहर समन्वयक पदावर रुजू झालेल्या शुभम कंखरे याचा तसेच वीज वितरण कंपनी धरणगाव येथे उपक्रेंद्र सहाय्यक पदावर नियुक्ती झालेल्या बुरहान शेख यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, योग्यतेचा सन्मान हा कार्याची ऊर्जा वाढवत असतो. गावातील नवयुवकांना या सत्कारातून एक नवी दिशा व उमेद मिळावी हा यामागील शुध्द हेतू आहे. याप्रसंगी खत्री समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र पडोळ सरांनी बुरहान त्यांचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो अशा शब्दांत भावना व्यक्त करून शुभम चे देखील कौतुक केलं. धरणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय संतोष पवार यांनी कार्यक्रमाची तोंडभरून स्तुती केली. गावातील तरुणांनी पुस्तकांची मैत्री करून अभ्यासाशी नाळ जोडावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. शुभम चा सत्कार पीएसआय संतोष पवार यांच्या हस्ते तर बुरहान चा सत्कार त्याचे गुरू राजेंद्र पडोळ सरांच्या हस्ते संपन्न झाला. ओळख महानायिकांची व शभूचरित्र बोधकथा हे अनमोल ग्रंथ तसेच शाल, गुलाबपुष्प देऊन आणि पेढे भरवून हा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व स्तरातील मान्यवरांनी देखील याप्रसंगी शुभम कंखरे व बुरहान शेख यांना सदिच्छा व्यक्त केल्यात.
याप्रसंगी नगरपरिषद धरणगावचे शहर समन्वयक निलेश वाणी, विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा.रविंद्र मराठे, सचिव नरेंद्र पाटील, सुधाकरशेठ वाणी, कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी, कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर, हेमंत माळी सर, आबासाहेब राजेंद्र वाघ, भागचंद चौधरी, गोपाल चौधरी, दिपक चौधरी, पप्पू कंखरे, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, बापू पाटील, विजय साळी, सुदर्शन भागवत, महेश पाटील, अकरम खान, नरेंद्र चौधरी, शिरसाठ सर, सुरज वाघरे, आनंदराज पाटील, जितु महाराज, मनिष चौधरी, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, समीर तडवी, प्रफुल पवार, अमोल सोनार, मयूर सोनार, गोलू चौधरी, सोनू चौधरी, राकेश चौधरी, दिनेश चौधरी, विजय निकम, नाना महाजन (भाजीपालावाले), छोटू पुरभे, दिपक झुंजारराव, बागुल दादा, महेंद्र चव्हाण, रामचंद्र मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.