जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगर पालिका क्षेत्रात सर्वोत्तम गुणवत्तेचे रस्ते बनविणेबाबत व बनविलेल्या रस्त्यावर दोष दायित्व कालावधीसहचे फलक लावण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांनी महापालिकेच्या आयुक्त्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, जळगाव शहरात विविध भागातील रस्ते बनविणयचे काम सुरू झाले असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबद्दल मनपा प्रशासनाचे अभिनंदन करत आहे. त्या सोबतच काही सुचना आम्ही उपस्थित करीत आहोत. याचा गांभीर्याने विचार करावा. नाशिक महानगरपालीकेत मनसेच्या कारकिर्दीत सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वांत सुंदर तथा सर्वोत्तम गुणवत्तेचे रस्ते बनविण्यात आले आहेत. अनेक वर्षे उलटुनही अद्याप तेथील रस्त्यात खड्डे पडले नाहीत. हे भ्रष्ट राजकारणांच्या कारभारात पहिल्यांदा घडले आहे. नाशिक शहरातील रस्त्यांचा हा सुखद अनुभव लक्षात घेवुन जळगाव शहरात पण असे सर्वोत्तम गुणवत्तेचे रस्ते तयार व्हावे, असे अपेक्षित आहे तसेच रस्त्यात १० वर्षात खड्डा पडला तर त्याची दुरुस्ती दोष दायित्व कालावधी अंतर्गत सर्व जबाबदारी ठेकेदारावर देण्यात यावी, अशी मागणी करीत आहोत. याबाबत मनसेचे नेते अॅड. जयप्रकाश बाविस्कर साहेब यांनी या अगोदरच आपल्याला पत्र दिलेले आहे. याबाबत मनपा प्रशासनाने ठेकेदाराला स्पष्ट सुचना द्याव्यात व रस्ते कामा दरम्यान रस्त्याची गुणवत्ता तपासण्याकरीता अधिकारी नियुक्त करावे, असे यात म्हटले आहे.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष अश्विन भोळे, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक आशिष सपकाळे, राजेंद्र निकम, जनहित कक्ष विभागाचे रज्जाक सैय्यद, संदीप मांडोळे, साजन पाटील, ललित शर्मा, मतीन पटेल, सतीश सैंदाणे, विकास पाथरे, योगेश पाटील, महिंद्रा सपकाळे, सागर कोळी, शिवा पुरोहित, इस्माईल खाटीक, राजू डोंगरे, स्वामीकांत पाटील, प्रशांत बाविस्कर, मिलिंद, मंगल आदी उपस्थित होते.