TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकाचवेळी फोडली सहा दुकाने ; चोरट्यांनी ६ लाख २० हजारांची रोकड नेली चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
November 25, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तोंडाला रुमाल आणि हातात मोजे घालून मध्यरात्रीच्या सुमारास सहा दुकानांचे कुलूप तोडून अन् शटर उचकावून चोरट्यांनी दुकानांमधून ६ लाख २० हजार ८०० रुपयांची रोकड आणि चांदीचे शिक्के चोरुन नेत धाडसी चोरी केली. ही घटना सोमवार दि. २४ रोजी सकाळी उघउकीस एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराशेजारी असलेल्या मार्केटमध्ये घडली. चोरी करतांना चोरटा एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. एकाच रात्री सहा दुकानांमध्ये चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न उपस्थित होवू लागले आहे.

एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराशेजारी असलेल्या मार्केटमध्ये नोमान शकील देशमुख (वय ३९, रा. सुप्रिम कॉलनी) यांचे न्यू. भारत केमीकल नावाने फिनाईल होलसेल डिस्ट्रीब्युर्टरचे दुकान आहे. त्यांच्याकडे सात महिला आणि दोन पुरुष असे एकूण सात जण कामाला आहेत. देशमुख हे नेहमी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवत असल्याचे त्यांच्यादुकानात काम करणाऱ्यांना माहिती आहे. त्यानुसार दि. २३ रोजी देशमुख यांनी ड्रावरमध्ये २ लाख ७५ हजार रुपये ठेवून त्याला लॉक लावून सायंकाळी साडेसात वाजता दुकान बंद करुन घरी निघून गेले. सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देशमुख यांना त्यांच्या ओळखीच्यांचा फोन आला. त्यांनी तुमच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून शटर अर्धवट उचकावलेले दिसत असल्याचे सांगितले. त्यानुसार देशमुख हे तात्काळ दुकानावर पोहचले. त्यांनी दुकानात जावून पाहणी केली असता, त्यांना काऊंटरवरील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता आणि ड्रॉवरचे लॉक तोडून त्यात ठेवलेली पावणेतीन लाखांची रोकड दिसून आली नाही.

READ ALSO

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी फोडली दुकाने
दोन दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी त्याच मार्केटमधील गाळा क्रमांक २१ चे मालक रामकृष्ण लालसिंग पाटील (रा. निवृत्ती नगर) यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ४५ हजारांची रोकड तर गाळा क्रमांक ५४ मधील जे. के ट्रेडर्सचे मालक सुनिल ताराचंद काकानी (रा. टीएमनगर, सिंधी कॉलनी) यांच्या दुकानाचे लॉक तोडून शटर उचकावून चोरट्यांनी तेथून ३० हजारांची रोकड चोरुन नेली. या मार्केटमधील चार जणांचे दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर चोरट्यांनी तेथीलच गाळा क्रमांक २ चे मालक सचिन सोमनाथ चौधरी (रा. न्यू. जोशी कॉलनी) यांच्या नितेश ट्रेडर्सच्या दुकानातून १५ हजारांची रोकड तर गाळा क्रमांक ८३ आणि ८४ मधील पवार क्रेन सर्विसचे मालक सुकलाल गजमल पवार (रा. एमडीएस कॉलनी, मेहरुण) यांच्या दुकानातील लोखंडी तिजोरीतून २८ हजार रुपये चोरुन नेले.

चोरी करण्यापुर्वी सीसीटीव्ही कॅमेरे फोडली
चोरट्यांनी एकाच रात्री सहा दुकानांमध्ये चोरी
केल्यामुळे एकच खळबळ माजून गेली आहे. या मार्केटमध्ये अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ही धाडसी चोरी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. चोरी करण्यापुर्वी चोरट्यांनी तीन ते चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. मात्र तरी देखील एका दुकानात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार चौकशी केली जात आहे.

व्यापारी संकुल अन् कंपन्या चोरट्यांच्या टार्गेटवर
एमआयडीसतील गुरांच्या बाजार परिसरात एमआयडीसी पोलिस रात्रीच्या वेळी पोलिस देखील या परिसरात गस्त घालीत नाही. त्यामुळे आता चोरटे थेट एमआयडीसतील कंपन्यासह तेथील मार्केट टार्गेट करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या धाडसीचोरीमुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तोंडाला रुमाल बांधून केली चोरी
चोरी करण्यासाठी आलेले चोरट्यांनी अंगात स्वेटर आणि जॅकेट तर डोक्यात टोपी घातलेली आहे. तसेच हातात हातमोजे आणि तोंडाला त्यांनी रुमाल बांधून चोरी केली. तसेच एका चोरटयाच्या हातात कपाट तोडण्यासाठी लोखंडी वस्तू आणि स्क्रू डायवर होता. त्याद्वारे चोरटे कपाट तोडतांनाचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

बेकरी रॉ मटेरीयलच्या दुकानातून अडीच लाख लांबवले
देशमुख यांच्या दुकानात चोरी झाल्याने त्यांच्या दुकानासमोर लोकांची गर्दी जमा झालेली होती. त्यामध्ये त्या मार्केटमधील गाळा असलेले राजेंद्र टेकचंद अग्रवाल (रा. महाबळ) यांच्या श्रुती इन्टरप्राईजेस या बेकरीच्या रॉ मटेरियल डिस्ट्रीब्युटर्सच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील टेबलाच्या लोखंडी ड्रॉवरमध्ये ठेवलेले १० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी १५ चांदीचे नाणे आणि अडीच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSix shops were broken into at once; thieves stole cash worth 6 lakh 20 thousand

Related Posts

गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 26 नोव्हेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘PFI’ च्या प्रकरणात माझ्या मुलाला बेकायदा अटक ; उन्नैस पटेलच्या आईचे पोलीस महानिरीक्षकांना पत्र !

October 23, 2022

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

December 25, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

April 29, 2021

प्रवीण दरेकर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार ; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता !

March 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group