TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘PFI’ च्या प्रकरणात माझ्या मुलाला बेकायदा अटक ; उन्नैस पटेलच्या आईचे पोलीस महानिरीक्षकांना पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) शी संबंधित जळगावमधील उन्नैस उमेर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव), याला नाशिकच्या गुन्ह्यात शानिवारी अटक केली होती. त्याच्यावर अटकेतील इतर आरोपींचे मोबाईल संभाषण नष्ट करत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, माझ्या मुलाला बेकायदेशीर अटक करण्यात करण्यात आली असून त्याला कोठडीत किंवा चकमकीत ठार मारतील, अशी भीती उन्नैस पटेलची आई शमीम पटेल यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षकांना ‘ई-मेल’द्वारे पाठवलेल्या तक्रारी पत्रात व्यक्त केली आहे.

काय म्हटले आहे पत्रात 

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

शमीम पटेल यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षकांना पाठवलेल्या तक्रारी पत्रात म्हटले आहे की, 27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 3:30 वाजता NIA, ATS आणि साध्या पोशाखातील पोलिसांचे लोकं दोन मोठ्या व्हॅनमध्ये आमच्या घरी आले आणि त्यांनी माझा मुलगा उनैस पटेल याला 151(3) अंतर्गत अटक केली. अटकेच्या वेळी त्यांनी त्यांचे ओळखपत्र दाखवले नाही. त्यांनी माझ्या मुलाला का अटक केली?, कोणत्या आधारावर केली?, याची माहितीही दिली नाही. यामुळे मी अक्षरशः त्या व्हॅनच्या मागे धावले. पण तरीही त्यांनी माझ्या मुलाला कुठे नेले?, याचे उत्तरही दिले नाही.

उन्नैस तपासासाठी वेळोवेळी हजर

मला नंतर कळाले की, उन्नैसला एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले आहे. त्यांनी पंचनामा न करता उन्नैसचा लॅपटॉप आणि मोबाईल घेतला व त्याच्या पंचनाम्याची कोणतीही प्रत दिली नाही. जळगाव न्यायालयाने त्याच दिवशी उन्नैसची सुटका केली. पोलीस त्याला ताब्यात घेण्याची मागणी करत होते. परंतू माननीय न्यायाधीशांनी त्याच दिवशी त्याला 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत हजेरी लावण्याच्या अटीवर सोडले. नंतर आम्हाला नाशिक एटीएसकडून सीआरपीसी 160, दोन नोटिसा मिळाल्या. 7 नोव्हेंबरला नाशिक भद्रकाली एटीएस कार्यालयात 8, 10, 12, 14, त्यानंतर 17, 19, 20, 21 नोव्हेंबरला देखील उन्नैस तपासासाठी हजर झाला. यावेळी त्याचा इतका छळ केला गेला की, त्याचे मानसिक संतुलन बिघडले. यानंतर 21 नोव्हेंबर 2022 रोजी नाशिक एटीएसने त्याला अटक केली आणि 22 नोव्हेंबर रोजी नाशिक न्यायालयात हजर केले. आम्हाला अद्याप माहित नाही की, पोलिसांनी कोणत्या आरोपाखाली उन्नैसला अटक केली आहे. आमच्याकडे एफआयआर आणि इतर कोणतीही माहिती नाही.

शमीम पटेल यांनी पत्रात उपस्थित केलेल्या प्रमुख आशंका
1. ही बेकायदेशीर अटक आहे. 2. लॅपटॉप आणि मोबाईल कोणत्याही पंचनामा प्रत शिवाय जप्त केले. 3. या मानसिक वेदना, छळ असून खूप मानसिक ताण आहे. 4. आम्हाला शंका आहे की ते त्याला कोठडीत किंवा चकमकीत ठार मारतील. 5. कोणतेही कबुलीजबाब जबरदस्तीने लिहू शकतात. 6. त्याला इतर प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने अडकवू शकतात. 7. माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जाऊ शकतो.

शमीम पटेल यांनी केलेली विनंती
1. उनैस निर्दोष आहे, तो पदवीधर आहे आणि त्याचे करिअर बनवत आहे. त्याच्यावर कोणतेही गुन्हेगारी स्वरूपाचे याआधी आरोप नाहीत. कृपया त्याला त्वरित सोडण्यात यावे. 2. कोणत्याही दबावाखाली कबुली जबाब घेतले जाऊ नयेत. 3. या प्रकरणाकडे लक्ष देऊन एटीएस, पोलिस, एनआयए इत्यादींवर कारवाई करावी. तसेच मी आणि माझे पती आता म्हातारे झालो आहोत आणि पतीला आधीच ब्रेन स्ट्रोक, बीपी आणि मधुमेह सारख्या अनेक वैद्यकीय समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे कलम 169 अंतर्गत माझा मुलगा उनैस पटेलची तात्काळ सुटका करावी. दरम्यान, हा तक्रारी ‘ई-मेल’ जळगाव पोलीस अधीक्षकांसह राज्याचे पोलीस महासंचालक यांना देखील पाठवण्यात आला आहे.

उन्नैस पटेलवर गंभीर आरोप !

पीआयएफच्या प्रकरणात अटकेतील संशयितांनी उन्नैस पटेल याची मदत घेऊन त्यांचे मोबाइल फॉरमॅट केल्याचे तपासात समोर आले. याआधी अटक केलेल्या संशयितांपैकी उन्नैसचा वसीम शेख याच्यासोबत संपर्क आला होता. त्याच्या मार्फत उन्नैस कय्युम शेखचा मोबाईल फॉरमॅट करून दिल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. त्याचप्रमाणे या संशयितांचा क्रिएटीव्ह माईड्स ग्रुप नावाचा व्हॉट्सअप ग्रुपही असल्याचे समोर आले. उन्नैसच्या मोबाइलमध्ये दोन ऑडीओ क्लीप आढळून आल्या असून त्यातील संभाषण आक्षेपार्ह असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एटीएसच्या पथकाने उन्नैस पटेल याची सुरुवातीस चौकशी करीत पुरावे आढळल्यानंतर त्यास शुक्रवारी (दि.२१) अटक केली. त्याला शनिवारी (दि.२२) न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद करीत १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यात संशयित उन्नैस याने इतर संशयितांचा मोबाइल फाॅरमॅट कसा केला?, त्यात कोणता डाटा होता?, ही माहिती गोळा करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने उन्नैस पटेल याला  ४ नोव्हेंबर पर्यंत एटीएस कोठडी सुनावली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonatc jalgaonPFI

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

भोसरी भूखंड प्रकरण : तपास यंत्रणा सत्तेतील व्यक्तींच्या तालावर नाचताय, न्यायालयाची गंभीर टिप्पणी : एकनाथराव खडसे यांची माहिती ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या एक दिवसआधी वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला !

June 27, 2023

सामाजिक सलोखा फेरी अंतर्गत घर जळालेल्या महिलेस आर्थिक मदत

June 18, 2022

पंडित मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त ५२५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तर ६० जणांचे रक्तदान

June 16, 2025

महत्वाची बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या…संपूर्ण वेळापत्रक !

January 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group