अमळनेर (प्रतिनिधी) आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये साक्षरता या विषयावर घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. घोषवाक्य स्पर्धेमध्ये इयत्ता नववीतील विद्यार्थी स्नेहल पाटील, भाग्यश्री पाटील, संजना पाटील, हर्षला पाटील, प्रणाली महाजन, तेजस पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यशस्वी विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षिसे दिली जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की, मानवी जीवनात शिक्षण एक महत्त्वाची यंत्रणा हे जी व्यक्तीसोबत देशाच्या विकासाकरीता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आज शिक्षण हे नवीन पिढीच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी साक्षरता करण्यासाठी आपल्या गावात परिसरात प्रयत्न केले पाहिजे असे म्हणाले. शाळेतील थँक्स अ टिचर उपक्रमात भाग घेणाऱ्या ८ विद्यार्थीयांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे आयोजक शाळेचे सांस्कृतिक विभागप्रमुख ईश्वर महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के एच.ओ. माळी, एस. के महाजन व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.