नागपूर (वृत्तसंस्था) झोपेत हाताच्या करंगळीला झालेल्या सर्पदंशाने बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान हद्दीतील दाभा येथे घडली. सिद्धानथी संदीप धोंगळे (वय ४, रा. साईनगर, दाभा), असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.
सोमवारी सिद्धानथी ही आपल्या राहत्या घरी नेहमी प्रमाणे खाली झोपलेली होती. रात्री १ वाजताच्या सुमारास तिच्या उजव्या हाताच्या करंगळीला साप चावला. यामुळे सिद्धांथी वेदनेने रडू लागली. साप चावल्याचे लक्षात येताच तिला नातेवाइकांनी तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी उपचारादरम्यान सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास तपासून तिला मृत घोषित केले