छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) घरातील शोकेसमधील साहित्य काढताना सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परवीन जफर सय्यद (वय ४५, रा. भिवधानोरा), असे मयत महिलेचे नाव आहे.
भिवधानोरा येथील परवीन जफर सय्यद या शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरातील शोकेसमधील साहित्य काढत होत्या. परंतू शोकेसमध्ये साप असल्याचे लक्षात आले नाही. कपडे काढतांना आतमध्ये असलेल्या सापाने परवीन यांना जोराने दंश केला. सापाने चावा घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेव्हापासून परवीन यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास परवीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.