नाशिक (वृत्तसंस्था) नवीन सामनगाव रोडवर मामी आणि भाच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचा उलगडा करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले आहे. भाच्याने शरीर सुखासाठी मामीचा गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याने बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. झोपी गेलेल्या मुलांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली.
असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली. एकलहरा गेट नवीन सामनगाव येथे सुदाम रामसिंह बनोरिया हा पत्नी क्रांतीसह मुलांसह राहात असून, तो एकलहरा गेट येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. सुदाम याचा भाचा अभिषेक राजेंद्र सिंह (वय २२) हा देखील एकलहरा सामनगाव परिसरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी (दि. ६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जखमी अभिषेक वाच्या ओरडण्यामुळे शेजारील राजेंद्र पाटील घराजवळ गेले असता विवाहिता क्रांती ही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. भाचा अभिषेक याच्या गळ्यावर वार व रक्तस्राव झाल्याने तो बोलू शकत नव्हता. त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. दरम्यान, घरात सुदाम यांची तीन्ही मुले झोपलेली होती.
पोलिसांनी घटनास्थळावरून खाटेवर रक्ताने माखलेला चाकू जप्त केला होता. अभिषेक याने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून पोलिसांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अभिषेकने स्वतःच्या गळ्यावर चाकूने मारून घेताना जास्त प्रमाणात लागल्याने त्याची प्रकृती अद्याप गंभीर असून, त्याला बोलता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिषेक घरी आला तेव्हा सुदाम याची दोन मुले झोपलेली होती, तर चार वर्षाची मुलगी जागी होती. तिने अभिषेक व आई क्रांती यांच्यात झालेले भांडण व त्यानंतर अभिषेकने केलेला चाकू हल्ला बघितल्याचे पोलिसांना सांगितले. झोपलेल्या मुलांनी उठ् नये म्हणून अभिषेकने त्यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारल्याचे तपासात उघडकीस आले असल्याचे निरीक्षक शेळके यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला जखमी अभिषेक बोलत नसल्याने पोलिसांनी त्याला लेखी प्रश्न विचारून त्याच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्याने रात्री साडेनऊ-पावणेदहा वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर मामी कांती हिच्यासोबत शरीर सुखाच्या मागणी केली असता दोघांमध्ये भांडण झाल्याचे सांगितले.