अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराने उत्साहात साजरा केला. सचिन भाऊ खंडारे मित्र परिवाराने सामाजिक उपक्रम राबवत अनोखा संदेश यातून दिला. सचिन खंडारे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वसामान्यांची कामे होण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमर संस्था चोपडा संचलित मानव सेवा तीर्थ, वेले ता. चोपडा जि. जळगाव येथे सचिन मधुकर खंडारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्या संस्थेतील विद्यार्थ्याना अन्नदान करण्यात आले. गरिबांच्या व वंचितांच्या तोंडात अन्नाचा घास पडावा हाच त्यामागचा उद्देश होता. यावेळी संस्थेने देखील त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यासोबतच वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला होता. वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराचा सक्रिय सहभाग असतो. प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सचिन खंडारे हे प्राधान्याने सक्रिय असतात.
यावेळी ईश्वर देशमुख, सुनील मराठे, लोटन पाटील, उमेश पाटील, भिमराव सदाशिव, धिरज पाटील, सौरभ पाटील, ऋषिकेश पाटील, विनित मराठे, रोहित देशमुख, मयुर भावसार, कपिल भावसार, राकेश भावसार, किरण महाजन, चेतन पाटील, स्वप्नील पाटील, तेजस पाटील, भैयु पाटील व सचिन भाऊ मित्र परिवार याप्रसंगी संस्थेचे शेषराव पाटील, नरेंद्र व संस्थेचे कर्मचारी होते.
















