मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. गतवर्षी जून महिन्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर मुंडे यांनी पुन्हा आपल्या कामास सुरूवात केली होती.
धनंजय मुंडे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी,’ असं आवाहन ट्विटरद्वारे धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
















