धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनवद येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीतून धरणगाव पोलिसात दोन्ही गटातील तब्बल १० जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या फिर्यादीत पुरुषोत्तम भानुदास ठाकूर (वय ६२, रा. सोनवद ता. धरणगाव) यांनी म्हटले आहे की, दि. ६ एप्रिल २०२२ रोजी ते आपल्या पत्नीसोबत बोलत होते. यावेळी अर्जुन नागो कोळी, पंकज अर्जुन कोळी, चावदस नागो कोळी, दिनेश नागो कोळी, हर्षल दिनेश कोळी, गौरव दिनेश कोळी, वसंत चिंतामण कोळी, सुग्रीव चिंतामण कोळी, चेतन कोडी (सर्व रा. सोनवद खु ता. धरणगाव) यांना वाईट वातून त्यांनी दोघांना चापटाबुक्क्यांनी तसेच काठ्या व विटांनी मारहाण केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. मोती पवार हे करीत आहेत.
तर दुसऱ्या फिर्यादीत अर्जुन नागो कोळी (वय ५५, रा. सोनवद खु ता. धरणगाव) यांनी म्हटले आहे की, रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अंगणात झोपलेले असतांना घरासमोर राहणारे पुरुषोत्तम भानुदास ठाकूर (वय ६२, रा. सोनवद ता. धरणगाव) हा जोरजोराने आरडाओरड करीत पत्नी सुमनबाई ठाकुर हिस मारत होता. त्यावर अर्जुन कोळी हे त्याला समजावून सांगु लागले की, तू बाईला मारु नको, आरडाओरड व शिवीगाळ करु नको, याचा पुरुषत्तोम ठकुर यास राग आल्याने त्याने कोणताही विचार न करता कोयत्यासारखे धारधार धातुची पट्टी कपाळावर मारून अर्जुन कोळी यांना जखमी केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम ठाकुर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. राजेन्द्र नामदेव कोळी हे करीत आहेत.