भुसावळ (प्रतिनिधी) येथील विशेष सरकारी अभियोक्ता राजेश गवई यांना तक्रारदाराकडून ५ हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने रंगेहात अटक केली.
याबाबत वृत्त असे की, वरणगाव पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यात आरोपीना जामीनास विरोध करावा व तो मिळू नये याकरता सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी भुसावळ येथील विशेष सरकारी अभियोक्ता राजेश गवई यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
यानंतर तक्रारदाराने याप्रकरणी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार नाशिक एसीबीचे पोलीस निरिक्षक उज्ज्वलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक विजय जाधव या पथकाने सापळा रचून राजेश गवई यांना जळगावातील तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयासमोर पाच हजार रूपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली.