मुंबई (वृत्तसंस्था) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यांचे राजीनामेही नामंजूर केले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यामुद्यावरून पंकजा मुंडे यांना एक सल्ला दिला आहे. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पार पडला. त्यामध्ये बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल अशी चर्चा सुरू होती. परंतू त्यांना कोणतही पद मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला सुरूवात केली. त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यांचे राजीनामेही नामंजूर केले.
केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यावेळी भूमिका मांडली. पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही नामंजूर केले.
दरम्यान राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलं असून या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं असल्याचं म्हटलं आहे.
“ताईंनी आज कौरवांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका,” असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.