TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव-यावलमधील वाहतुकीला येणार गती : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांनी पाळला शब्द ; आसोदा रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपुजन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 4, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेळगाव बंधार्‍याजवळच तापी नदीवर पुल बांधण्यात येत असून या मार्गाचे आधीच विस्तारीकरण झालेले आहे. यातच आता आसोदा येथील रेल्वे गेटजवळ उड्डाण पुलाची निर्मिती होणार असल्यामुळे जळगाव ते यावलमधील वाहतुकीला गती येणार असून आसोदा, भादलीसह परिसराचा विकास देखील होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आसोदा गेटजवळच्या रेल्वे उड्डाण पुलास २०१९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तब्बल २३ कोटी ४८ लक्ष रूपयांची तरतूद असणारा हा पुल सार्वजनीक बांधकाम विभाग आणि रेल्वेतर्फे संयुक्तपणे करण्यात येणार असून याची जबाबदारी महारेलवर टाकण्यात आलेली आहे. वर्षभरात हा पूल पुर्ण होणार असून या माध्यमातून ना. गुलाबराव पाटील यांनी परिसरातील जनतेला दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती देखील होणार आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अनेक महत्वाच्या पुलांच्या कामांना गती मिळालेली आहे. यात प्रामुख्याने शहरातील शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तर पिंप्राळा आणि भोईटेनगर पुलांचे काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. म्हसावद आणि दापोरा येथील पुलांचे काम प्रगतीपथावर असून खेडी – भोकरी ते भोकर दरम्यान तापी नदीवर भव्य पुलाची निर्मिती देखील लवकरच होणार आहे. या अनुषंगाने ना. गुलाबराव पाटील यांच्याच पाठपुराव्याने जळगाव ते आसोदा या दोन्ही गावांना जोडणार्‍या रेल्वेवरील उड्डाण पुलास २०१९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यासाठी २३ कोटी ४७ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असून यापैकी ४ कोटी रूपयांचा निधीही ऑक्टोबर २०२१ मध्ये अदा करण्यात आलेली आहे. यानंतरचे सर्व तांत्रिक बाबींचे सोपस्कार पार पडल्यानंतर आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपुजन करण्यात आले.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, महापौर सौ. जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, , नगरसेवक प्रवीण कोल्हे. भरत सपकाळे, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, तुषार महाजन, किशोर चौधरी, आसोदा येथील सरपंच पती दिलीप पाटील, उपसरपंच पती गिरीश भोळे, रेल्वेचे डीजीएम प्रभात किरण, गोटू नारखेडे, मुकेश महाजन, शरद नारखेडे, राजू महाजन यांच्यासह आसोदा व परिसरातील नागरिक उपस्थित होते. महारेलचे डीजीएम अधिकारी प्रभात किरण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पुलाची तांत्रीक माहिती देऊन याचे काम वेळेत पूर्ण होईल अशी ग्वाही दिली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण विकास कामांमध्ये कधीही शहर आणि ग्रामीण असा भेद केलेला नाही. यातच हा उड्डाण पुल जळगाव आणि आसोदा म्हणजेच शहर आणि गावाला जोडणारा आहे. या भागावर वाहतुकीचे खूप मोठे प्रमाण असून रेल्वे गेटमुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असतो. याची दखल घेऊन या गेटजवळच रेल्वे उड्डाण पुल निर्मितीसाठी आपण पाठपुरावा केला असून आज भूमिपुजनाच्या माध्यमातून हे काम प्रत्यक्षात सुरू होत असल्याचा आपल्याला आनंद आहे.यावेळी सदर पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने करून मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना ही ना.गुलाबराव पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याआधी तापी नदीवर शेळगाव ते टाकरखेडा आणि वाघूर नदीवर कडगाव ते जोगलखेडा या गावांच्या दरम्यानच्या पुलांचे काम आधीच सुरू झालेले आहे. यात आता उड्डाण पुलाचे काम सुरू होणार असून हा पूल पुर्ण झाल्यानंतर येथील वाहतुकीला वेग येणार आहे. यामुळे जळगाव आणि यावलमधील अंतर कमी होणार असून साहजीच परिसरातील प्रगतीला देखील पंख लागणार आहे. आगामी काळात उर्वरित कामांना वेग देण्याचा आपला प्रयत्न असेल अशी ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.कार्यक्रमाचे आभार तुषार महाजन यांनी मानले.

असा असेल रेल्वेचा उड्डाण पुल

आसोदा रेल्वे गेट जवळच्या उड्डाण पुलाचे काम हे सार्वजनीक बांधकाम खाते आणि रेल्वेतर्फे संयुक्तपणे करण्यात येत असून याच्या कार्यान्वयनाची जबाबदारी ही महारेलवर टाकण्यात आलेली आहे. या पुलाची लांबी ७६० मीटर असून यात ७ गाळे असणार आहे. हा पूल वर्षभरात तयार होणार आहे. या पुलाचे संपूर्ण काम हे राज्य सरकारच्या निधीतून करण्यात येणार असल्याची बाब लक्षणीय आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
Next Post

रक्षकच बनला भक्षक ! १३ वर्षीय मुलीवर आधी स्टेशनवर गँगरेप नंतर पोलीस स्टेशनमध्येही बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आम्हा तिन्ही पक्षांना रोज एकमेकांची आठवण येते’ ; राऊतांच्या विधानाने सभागृहात एकच हशा !

December 11, 2021

गणपूर प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन !

December 8, 2023

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात आणखी तिघांना अटक !

June 17, 2021

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन

February 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group