चोपडा (प्रतिनिधी) श्री गोल मंदिर हे नाव उच्चारलं तरी चोपडा शहरातील संस्कृतीचं साक्ष देणारा हा चौक आपल्या डोळ्यासमोर येतो.या चौकात देवाधिदेव महादेवांचं अति प्राचीन स्थापना असलेलं महादेवाचे मंदिर व श्री हनुमान मंदिर सर्व दानशूर, शिवभक्तांच्या सहकार्याने नवीन रुपात देखणे झाले असून या स्वप्नवत मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.१२ डिसेंबर रोजी गोल मंदिर मेन रोड चोपडा येथे होत आहे.
कार्यक्रमाला प्रमुख आशीर्वाद प.पू.संत.श्री. सखारामजी महाराज अमळनेर प.पू.श्री. महामंडलेश्वर श्री.जनार्दनजी स्वामी फैजपूर तर प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प.पंडित भक्तराजजी महाराज (श्री क्षेत्र मुल्हेर ता. बागलाण), प.पू.श्री. आनंदजीवन स्वामीश्री (स्वामी नारायण मंदिर,धुळे) महंत प्रा.ह.भ.प. श्री.सुशीलजी महाराज,विटनेरकर (अध्यक्ष, अ.भा.वारकरी मंडळ,जळगाव जिल्हा),प.पू. श्री.पंडित मेवालालजी पाटीदार (जामती संभव, गायत्री शक्ती पीठ),प.पू.श्री. रामदेवजी चंपालजी शर्मा (श्री बावजी कळमसरा दरवार, अमळनेर),प्राणप्रतिष्ठेचे कर्माचार्य प्राणप्रतिष्ठेचे आचार्य श्री. प्रमोदजी रामचंद्र थेटेगुरुजी धुळे, श्री. विनोदजी महाराज जोशी चोपडा या मान्यवरांची उपस्थित लाभणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा-सोमवार, दिनांक ९/१२/२०२४ शोभायात्रा,शोभा यात्रेत प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद प.पू.श्री. महामंडलेश्वर श्री. जनार्दनजी स्वामी, फैजपूर दुपारी ३:०० वाजता ठिकाण: श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून संगीतमय सुंदरकांड कथा व भजन श्री रामभक्त हनुमान मंडल बलवाड़ी म.प्र. शनिवार ८:३० वा. ठिकाण: गोलमंदिर, चोपडा.
मंगळवार, दिनांक १०/१२/२०२४
गणेश पूजन, मंडप पूजन, प्रवेश, पीठस्थ देवता पूजन, मंदिर वास्तुशांती सकाळी ८:०० ते १२:३० वाजेतर्यंत,देवता दशविधी आवर्तन संख्या जलाधी वास वेळ : दुपारी २:०० ते ६:०० भजन संध्या भजनसम्राट श्री. पवनभाई शर्मा, मुंबई यांची अमृतवाणी वेळ : रात्री ८:०० वाजता.
बुधवार, दिनांक ११/१२/२०२४
मंडप देवता पूजन रूद्र आवर्तन (आवर्तन संख्या) धान्य अधिवास, मूर्तीन्यास सकाळी ८:०० ते १२:३० वाजेतर्यंत,मंदिरस्नपन मदयन्यास, मूर्तीस्नपन, अवयव न्यास, हवन, दिपोत्सव, आवर्तन संख्या, शयन अधिवास वेळ : दुपारी २:०० ते ६:३० वाजेतर्यंत शिवमहात्म्य कथा महंत प्रा.ह.भ.प.श्री. सुशिलजी महाराज (विटनेरकर) यांची अमृतवाणी वेळ : रात्री ८:०० वाजता.
गुरुवार, दिनांक १२/१२/२०२४
मंदिर वास्तु निक्षेप, मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण, देवपूजा उपचार देवपूर्णाहूती, महाआरती.सकाळी ७:३० ते १०:०० वाजता मूर्तीस्थापना, कलशारोहण व ध्वजारोहण सकाळी १०:१५ वाजता.शुभहस्ते : ह.भ.प. पंडित भक्तराजजी महाराज मठाधिपती, श्री क्षेत्र मुल्हेरता. बागलाण (श्री उधवजी महाराज संस्थान १२ वे उत्तराधिकारी),महाप्रसाद दुपारी ११:०० वाजेपासून वितरीत केला जाणार आहे.तरी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नागेश्वर बाबा गोल मंदिर समिती चोपडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.