भोपाळ (वृत्तसंस्था) इंदूरहून जळगावला जाणारी बस नर्मदा नदीत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशच्या धारमध्ये भीषण अपघात झाला.
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट इथं ही घटना घडली आहे. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बलकवाडा येथील खलटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बस एसटी महामंडळाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. इंदुरवरून ही बस पुण्याकडे येत होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 12 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर यासोबतच १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. बस इंदौरहून पुण्याला जात होती. नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये ५०-५५ जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, एसडीआरएफ पथक आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य आणि मदतकार्य सुरू केले आहे. इंदूर आणि धारहून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
नेमकं काय झाले?
महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस सकाळी 7च्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे जात होती. इंदूरमध्ये 12 प्रवासी चढले. त्यानंतर अचानक नर्मदा नदीवरील ब्रिजवरुन खाली कोसळली. आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते, अशी माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.