TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जावयाला मुलगा मानून लावला दुसरा विवाह !

जळगाव येथील ॲड. संजय राणे व कुटुंबाचा आदर्शवत निर्णय

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मागील वर्षी कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे अनेकांना नातेवाईक व आप्तेष्ट गमवावे लागलेत. बहुतांश जणांचे संसार अर्ध्यावर मोडले. या आघातातून काही कुटुंबे सावरू लागली आहेत. नव्याने संसाराची उभारणी होत आहे. अशा फेरजुळणीत एक आदर्शवत गंधर्व विवाहविधी वरणगाव (ता. भुसावळ) येथे पार पडला. कोरोना संसर्गामुळे विवाहित कन्येला गमावणाऱ्या पालकांनी जावई व दोन नातींचे कुटुंब पुन्हा फुलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जळगाव येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ व भोरगांव लेवा पंचायतीचे कुलसचीव ॲड.संजय राणे यांचे थोरले बंधू मिलिंद मनोहर राणे (रा. अहमदाबाद) यांची कन्या कोमल हिचा विवाह अहमदाबाद येथील सुजीत दिलीप महाजन यांच्याशी झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गामुळे कोमल हिचे दि. ३ मे २०२१ ला निधन झाले. स्व. कोमल व सुजीत यांना उर्वि व चार्वी अशा दोन मुली आहेत. त्या दोघी लहान आहेत. स्व. कोमल ही सातवीत असताना पासून तिचे संपुर्ण शिक्षण हे आजोबा एम. डी. राणे, आजी स्व. पुष्पलता व काका ॲड. संजय व किरण राणे यांच्याकडे जळगावला झाले. तिचे लग्नही त्यांच्या पुढाकाराने सुजीत यांच्याशी जुळले होते. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र कोरोनाच्या आपत्तीने संसाराला दृष्ट लागली.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

स्व. कोमलच्या अकाली निधानानंतर जावाई आणि नातींचे कुटुंब अधुरे झाले. सुजीत यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी ॲड. संजय राणे यांनी कुटुंबात पुढाकार घेतला. ॲड. संजय राणे हे भोर पंचायतीचे कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. ते पंचायतीच्या सर्व कार्यात सहभागी होतात. अनेकांचे दुरावलेले वा घटस्फोटीत संसार ते पुन्हा जुळवतात. ॲड. संजय राणे यांनी सुजीत यांचा दुसरा विवाह करण्याचे सूचविले. जेष्ठ बंधु मिलिंद व उद्योजक किरण राणे व सुजीत यांचे वडील दिलीप महाजन व आजोबा एम. डी. राणे यांनीही हा विचार उचलून धरला. सुजीत हे सुद्धा तयार झाले.

ॲड. संजय राणे व कुटुंबियांनी सुजीत यांना मुलगा मानून त्यांचा दुसरा विवाह जुळवायला प्रयत्न सुरू केले. परिचितांमधून नशिराबाद (ता. जळगाव) येथील विनोद रोटे यांची कन्या लिनाचे स्थळ समोर आले. लिना घटस्फोटीता आहे. ती सुद्धा दुसऱ्या विवाहास तयार होती. अखेर राणे-महाजन कुटुंबियांच्या संमतीने रितसर विवाह जुळणी झाली. सुजीत व लिनाचा गंधर्व विवाह गुरूवार, दि. ९ रोजी पार पडला. या विवाहाकडे आदर्शवत आणि अनुकरणीय पाऊल म्हणून पाहता येते. जुन्या परंपरा मोडून कुटुंब पुन्हा फुलविण्याचा राणे, महाजन व रोटे कुटुंबाचा हा प्रयत्न समाज परिवर्तनाचा नवा माईलस्टोन रोवणारा असून समाजासमोर आदर्श घडविणारा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

धक्कादायक ! आईच्या मृत्यूनंतर मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेहरू युवा केंद्राचे पुरस्कारांसाठी १९ ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

September 27, 2021

पती-पत्नी घराबाहेर, कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज !

August 10, 2023

धरणगाव : बैलगाडीला दुचाकीची मागून धडक ; एकाचा मृत्यू, एक जखमी !

May 28, 2022

हार घालताच नवरीने नवरदेवाच्या दिल्या दणादण कानाखाली ; व्हिडीओ बघून व्हाल थक्क ! (व्हिडीओ)

April 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group