TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून सात केंद्रावर ‘कोविड १९’ लसीकरण मोहिमेस सुरुवात

पहिल्या दिवशी सात केंद्रावर ७०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात येणार लस

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात शनिवार १६ जानेवारी, २०२१ पासून सात केंद्रावर कोविड-१९ लसीकरण मोहिमेस सुरूवात होणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर १०० असे एकूण ७०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह आयएमएचे प्रतिनिधी, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव, म.न.पा अंतर्गत डी.बी.जैन हॉस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा आणि जामनेर तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा व चाळीसगाव आणि न. पा. भुसावळ असे ७ केंद्रांवर राबविण्यात येईल. या मोहिमेसाठी प्रति लसीकरण केंद्र १०० लाभार्थी याप्रमाणे एकूण ७०० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. या लसीकरण मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण १९ हजार ९५१ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी ‘कोविशील्ड’ या लसीचे २४ हजार ३२० डोस (२४३२ Vial) जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणाऱ्या सात केंद्रांवर सर्व आवश्यक व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. नियुक्त कर्मचारी आणि लस टोचकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व केंद्रावर लसीकरणाबाबत माहिती अद्ययावत करण्यासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व बाबींची तपासणी आज करण्यात आली आहे.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

राष्ट्रीयस्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उदघाटन झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेस सुरुवात होईल. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यत असणार आहे. लाभार्थींना शक्यतोवर लस दंडावर देण्यात येणार असल्याने त्याअनुषंगाने कपडे परिधान करावे. लाभार्थ्यांनी आपले नोंदणीच्या वेळी दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड लसीकरणाच्या दिवशी सोबत आणावे. लाभार्थ्याचे लसीकरण कक्षात प्रवेश करण्यापुर्वी व्हॅक्सीनेशन ऑफिसर हात सॅनिटाईज करुन (हात धुणे), तापमान व ॲक्सीमिटरव्दारे ऑक्सीजनची पातळी तपासली जाईल. लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये तपासुन नंतर त्याला वेटींग रुममध्ये प्रवेश देण्यात येईल. व्हॅक्सीनेशन ऑफिसर २ हा आलेल्या लाभार्थ्यांचे ओळखपत्र तपासेल व त्याची कोविन ॲपमध्ये पडताळणी करुन त्यानंतर लाभार्थीला लसीकरण कक्षात पाठवेल. लसीकरण कक्षात व्हॅक्सीनेटरमार्फत लाभार्थ्यांस इंजेक्शनव्दारे दंडात लस दिली जाईल. लाभार्थ्यास लस घेतल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र/कोरोना कंट्रोल रुम ०२५७-२२२६६११ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. लाभार्थ्यांस जर काही त्रास झाला तर त्याठिकाणी उपचाराची आवश्यक साधनसामुग्रीची AEFI किटही उपलब्ध असेल. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने कोणीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरवू नये. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच नागरीकांनीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणी चुकीची माहिती पसरवित असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

नाशिक विभागात उद्या ४० केंद्राद्वारे होणार ४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अश्लील व्हिडिओ दाखवून बहीण लहान भावाशी करायची सेक्स ; गर्भवती झाल्यानंतर सत्य आलं समोर !

August 26, 2021

संतापजनक ! भुसावळात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच केला अत्याचार !

March 7, 2022

इंदापूरमध्ये दगडाने ठेचून मित्राचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

October 17, 2024

तरुणाला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा आरोप ; जळगाव एलसीबीच्या पाच जणांना खंडपीठाची नोटीस !

July 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group