धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे बंद करण्यात आलेला गुरुवारी भरणारा आठवडे बाजार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी धरणगाव मुख्यधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भाजपा नगरसेवकांनी मुद्दे मांडले की, शहरासह तालुक्यात बरेच छोटे व्यवसायिक आहेत की, त्यांच्या उदरनिर्वाह हा आठवडे बाजारावर अवलंबून आहे. आता कोरोनाचा प्रदुभाव कमी झाला आहे. त्यामुळे आठवडे बाजार सुरु करावा, अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी नगरपालिका मुख्यधिकारी जनार्दन पवार यांच्याकडे केली. पवार साहेबांनी लगेच प्रांतधिकारी गोसावी साहेब यांच्यासोबत चर्चा केली व लवकर आठवडे बाजार सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, यावेळी शहरातील विविध समस्यांविषयी देखील चर्चा करण्यात आली. यावेळी न.पा. गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, ललित येवले, भालचंद्र माळी,कडू बयस, गुलाब मराठे हे उपस्थित होते.