जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. त्यामुळे माझ्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील काही गावांना जाणा-या बस पुर्वीच्या वेळेप्रमाणे दररोज तात्काळ सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभाग नियंत्रक यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माझ्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील काही गावांना जाणा-या बस कोविड-१९ च्या प्रभावामुळे बंद करण्यात आलेल्या आहेत. परंतु सध्या कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. तरी आपण पूर्वी सुरु असलेल्या धरणगाव-बाभूळगाव, धरणगाव-अंजनविहीरे, अमळनेर-अंजनविहीरे, एरंडोल-बाभूळगाव, जळगाव-चोरगाव, धरणगाव-बाभूळगाव आणि जळगाव-दोनगावमार्गे रेल-लाडली या बस पुर्वीच्या वेळेप्रमाणे दररोज तात्काळ सुरु करण्यात याव्यात, असे म्हटले आहे.
















