जळगाव (प्रतिनिधी) ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सुरु करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास मनसे बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन गोट्या खेळा आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त उपक्रमातून लीड बँकेच्या माध्यमातून ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचलन केले जाते. शहरात सेन्ट्रल बैंक ऑफ इंडीया लीड बँक असुन बॅंकेमार्फत महाबळ परीसरात अर्धा एकर जागेमध्ये अलीशान इमारत बनविण्यात आली असून त्या ठिकाणी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. ग्रामीण रोजगार प्रशिक्षण केंद्रामार्फत निवास व्यवस्था व निशुल्क निशुल्क प्रशिक्षण देण्याची तरतुद आहे. त्याकरीता ग्रामीण भागातील ६०% विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या दारीद्र रेषेखालील असावीत असा नियम आहे.
१८ ते ४५ वयोगटातील बेरोजगार तरुणांना विविध प्रकारच्या कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक बनविणे हा हेतु आहे. यामुळे बेरोजगारी फार प्रमाण कमी होईल, असा शासनाचा कयास आहे. दरम्यान महाबळ, जळगाव येथील सेन्ट्रल बैंक संचलित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राची इमारत धूळखात पडली असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या या उपक्रमाला हरताळ फासला जात आहे. आपण योग्य ती चौकशी करून प्रशिक्षण केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन इमारती समोर गोट्या खेळा आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
याप्रसंगी जमील देशपांडे-जिल्हाध्यक्ष मनसे विनोद शिंदे -विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, राजेंद्र निकम-जिल्हा संघटक रस्ते आस्थापना, संदीप मांडोळे, जनहित कक्ष-महानगर अध्यक्ष, आशिष सपकाळे, कुणाल पवार, शिवकुमार पुरोहित, कुणाल पाटील, साजन पाटील उपस्थित होते.