जळगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांचा बहुमान वाढवा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन सोनल ग्रुमिंगच्या संचालिका सोनल राठोड व भाग्यदीप मुव्हीजचे संचालक प्रदीप भोई,प्रांजल पंडित यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय फॅशन शोचे आयोजन दिनांक २५ जून २०२३ रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्य गृहात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात आले. या फॅशन शोकरिता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण ७१ स्पर्धक सहभागी झाले. यावेळी स्पर्धक रॅम्पवॉक करून जळगावकरांना मंत्रमुग्ध करणार आहेत तरि युवा पिढी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
परीक्षक म्हणून यांची असणार उपस्थिती !
जळगाव शहरात पहिल्यांदाच होतं असलेल्या राज्यस्तरीय ‘फॅशन शो’ च्या स्पर्धेला परीक्षक म्हणून दुबई- २०१८ च्या पुणे मिसेस इंडिया इंटरनॅशनल फॅशन शो मधील विजयी स्नेहा प्रल्हादका,दुबई – २०२१ च्या मिसेस एशिया इंटरनॅशनल पिंकी तिलोकचंदानी, रोडीज रियालिटी शो चे होस्ट सादिया खान, न्यू पुणे मॉडेलचे हेड अक्षय बजाज यांच्यासोबत सहपरीक्षक म्हणून सोनल राठोड, परीदी पाटील आणि मुनेश ढाके उपस्थित राहून स्पर्धेचा निकाल जाहीर करतील.
प्रमुख अतिथी म्हणून यांची उपस्थिती !
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र हास्य जत्रेचे टीव्ही कलाकार हेमंत पाटील,७२ मैल एक प्रवास, रिंगण चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक महेंद्र खेडकर तसेच जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, दैनिक साईमतचे संपादक व परेश रेसॉर्टचे संचालक प्रमोद बर्हांटे, लोकहित दर्पणच्या संपादिका सुरेखाताई बर्हांटे, माजी महापौर विष्णू भंगाळे, शीतलचे कलेक्शनचे संचालक मनोहरलाल नाथानी, कॅटल ऑफ ड्रीम फ्लिम सिटीचे संचालक मुनेश ढाके, जे.वी. चॉईस आणि ब्युटीकचे संचालक मयूर चौधरी, मानक ज्वेलर्सचे संचालक जितेंद्र चोरडिया, एबीएस जिमचे संचालक हितेश पाटील, ९४.३ एफएमचे अद्ननान देशमुख, आरजे देवा, समृद्धी क्रियेशनचे निर्माते डॉ. प्रवीण चौधरी हे लाभणार आहे. तसेच परीदी पाटील व सौभाग्य सेनापती हे देखील मोलाचे सहकार्य करत आहेत.
फॅशन शो बद्दल गैरसमज…!
‘फॅशन शो म्हणजे’ वेगवेगळे कपडे घालून, रॅम्पवरून लचकत- मुरडत चालायचं एवढंच नसतं. नवा विचार नवा विचार मांडण्याचे ते एक माध्यम आहे.आजची पिढी फॅशनेबल आहे, आजच्या मुली काय तऱ्हेतऱ्हेचे चित्रविचित्र कपडे घालतात, भलेमोठे दागिने काय, रंगवलेले केस काय, ही यांची फॅशन… नव्या पिढीच्या फॅशनबद्दल असे कितीतरी गैरसमज समाजात आहेत त्यातल्या त्यात ग्रामीण भागात असे गैरसमज पाहायला मिळतात म्हणून ‘फॅशन शो’ ही कॅन्सेप्ट स्पष्ट होऊन याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावे म्हणूनचं आयोजकांनी नेहमीच मेट्रो शहरामध्ये होणारा हा राज्यस्तरीय ‘फॅशन शो’ जळगाव मध्ये घेतला आहे.
कोण आहेत सोनल राठोड !
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘फॅशन शो’ आयोजिय करणाऱ्या सोनल राठोड कोण आहेत असा प्रश्न सहजच जळगावकरांच्या मनात आला असेलच तर जाणून घेऊया सोनल राठोड यांच्या बद्दल… सोनल राठोड या मुळं जळगावच्या असून त्या ‘सोनल ग्रुमिंगच्या’ च्या संचालिका आहेत. गेल्या १३ वर्षांपासून त्या ‘मेकअप’ म्हणजेच रंगभूषा क्षेत्रात, चित्रपट व लघुचित्रपटात रंगभुषा करण्याचे काम अविरतपणे करत असून त्यांना गेल्या वर्षीचं राज्य नाट्य स्पर्धेत ‘राशोमान’ या नाटकातील रंगभुषासाठी द्वितीय पारितोषिक मिळाले असून नाशिक येथे राजस्तरीय बिझनेस एक्सलन्स अवार्ड देखील मिळाला आहे.
प्रदीप भोई एक उत्कृष्ट दिग्दर्शक !
जळगाव येथे होत रंगणार असलेल्या फॅशन शो च्या माध्यमातून आयोजक म्हणून प्रदीप भोई यांचे नावं पुढे आले असता त्यांनी कमी वयात कला क्षेत्रात मोठं नावं कमावलं आहे. त्यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘सप्न’ चित्रपटाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तब्ब्ल ३९ अवार्ड मिळाले आहेत. ‘सप्न’ चित्रपट अजून थिएटर मध्ये प्रदर्शित होणे बाकी आहे.तर प्रदीप भोई यांना कोलकाता इंटरनॅशनल फ्लिम फेस्टिवल तर्फे उत्कृष्ट दिग्दर्शक अवार्ड देखील मिळाला आहे. चित्रपट, लघुचित्रपट, मराठी गाणी, वेब सिरीज, नाटक क्षेत्रात प्रदीप भोई यांची मोठी कामगिरी आहे.