मुंबई (वृत्तसंस्था) कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबईतर्फे दिला जाणारा २०२१ चा “संगीत कला रत्न ” पुरस्कार समता नगर हिंदी महानगर पालिका शाळा मुंबई येथील श्रीमती छाया भानुदास साखरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
छाया भानुदास साखरे या मूळच्या लातूर येथील रहिवासी असून गेल्या २० वर्ष पासून कलेचे साधना व सेवा करीत आहेत. या कार्यामुळे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात मुंबईचा, आदर्श संगीत शिक्षिका महापौर पुरस्कार २०१८, गुजरात गिरनार संगीत रत्न पुरस्कार, छाया साखरे या विद्यार्थ्यांसाठी वैविध्यपूर्ण सांगीतिक उपक्रम राबवून भव्य मंच प्राप्त करून दिला आहे. संगीत क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्य केल्याबद्दल आयोजक श्रीराम महाजन यांनी निवडपत्र देऊन अभिनंदन केले आहे. छाया साखरे ह्या शास्त्रीय गायिका आहेत तसेच बॉलिवूड क्षेत्रात प्ले बॅक सिंगर आहेत व अभिनेत्री आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्रीमती छाया साखरे यांना मित्र परिवार, त्यांचे गुरुजन शास्त्रीय गायिका पद्मभूषण, श्रीमती प्रभा अत्रेजी आणि पद्मश्री अनुप जलतोजी यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले. तसेच कौटुंबिक सदस्य परिवार यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.