जळगाव (प्रतिनिधी) खेळाडूंना व उदयनमुख क्रीडापटूंना आकर्षित करण्यासाठी राज्यात व जिल्ह्यात परवडणाऱ्या फी मध्ये क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावे, क्रीडा संकुलाची नोंदणी फी व शुल्क जास्त आकारले जाते. फ्री कमी करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा क्रीडा संघटनेने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देवून शासनाकडे मागणी केली.
राज्यातील क्रीडा संकुले ही मार्च २०१९ पासून ऑक्टोबर २०२० पर्यंत बंद होती ती ५ नोव्हेंबर २० पासून काही प्रमाणात सुरू करण्यात आल्याबद्दल जळगाव जिल्लाह क्रीडा संघटना तील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अभिजित राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
जळगाव क्रीडा संकुलाची नोंदणी फी ही वर्षासाठी ३५० रुपये होती व शंभर रुपये मॉर्निंग वॉक व वैयक्तिक क्रीडा प्रकाराच्या सराव करणाऱ्यांसाठी होती. १ नोव्हेंबर पासून ३१ मार्च २२ पर्यंत पाच महिन्याची नोंदणी फी दोनशे रुपये व वयक्तिक सराव शुल्क शंभर रुपयाचे ऐवजी दोनशे रुपये क्रीडासंकुल समिती ने चुकीच्या पद्धतीने आकारले ते त्वरित रद्द करावे व नोंदणी फी पाच महिन्याची दीडशे रुपये व मॉर्निंग वाक व वैयक्तिक सरावाचे शंभर रुपये दरमहा ठेवण्यात यावी अशी मागणी केली.
राज्य क्रीडा धोरण ची अंमलबजावणी त्वरित करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीमती आयशा खान, विविध क्रीडा संघटनांचे प्रमुख फारुक शेख, आंतरराष्ट्रीय खेळाडू विवेक आळवणी, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंग, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू व प्रशिक्षक रवींद्र धर्माधिकारी, राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक शेखर देशमुख, यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले असून त्यात मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की एकीकडे आपण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी राज्यात परवडणारी सिनेमागृह उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे अशी ग्वाही देत आहात तर याउलट महाराष्ट्र राज्यातील उदयोन्मुख खेळाडू व क्रीडापटू यांच्यात असलेले कलागुण आपण आकर्षित होऊन व राज्यात उभारली गेलेली क्रीडा संकुले मध्ये खेळाडूंना व क्रीडा संघटनांना अल्पदरात तेथील सुविधा उपलब्ध करून द्या जेणेकरून या राज्यातून जागतिक पातळीवरचे खेळाडू महाराष्ट्राचे व जळगावचे प्रतिनिधित्व करू शकतील.
निवेदनामध्ये क्रीडा संकुलात हॉकी, फुटबॉल ,सॉफ्टबॉल, बास्केटबॉल, या खेळाडूंना सुद्धा वैयक्तिक सरावासाठी आपल्या क्रीडा साहित्य सोबत प्रशिक्षणाची ची संधी उपलब्ध करून द्या त्याच प्रमाणे क्रीडा धोरण मध्ये असलेल्या योजनांचा पाठपुरावा करा ,जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीत जळगाव येथील क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घ्या, प्रत्येक क्रीडा व विभागीय क्रीडा संकुलात विविध क्रीडा संघटनांसाठी कार्यालय उपलब्ध आहे ती कार्यालय संघटनांना त्वरित देण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना आयशा खान यांच्या हस्ते देण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे स्वतः क्रीडापटू असल्याने निश्चितच त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली व क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सुविधा बाबत प्रशिक्षक किशोर सिंग यांनी काही उणिवा निदर्शनास आणून दिल्या तर आंतरराष्ट्रीय खेळाडू विवेक अळवणी यांनीसुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना क्रीडासंकुलात विशेष पास देण्यात यावी त्याच प्रमाणे बास्केटबॉल क्रीडांगणासाठी रवींद्र धर्माधिकारी यांनी आपली बाजू मांडली तर हॉकी व फुटबॉल यासाठी फारुक शेख यांनी विविध उपाययोजना जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान यांनी क्रीडासंकुलात कॅरम प्रशिक्षण सुरू करण्याबाबत विनंती केली तर क्रिकेटचे शेखर देशमुख यांनीसुद्धा क्रीडासंकुलात क्रिकेट खेळ व सरावासाठी विशेष वेळ देण्यात यावा अशी विनंती केली.
जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या हाती असलेले निर्णय त्वरित मीटिंग घेऊन पूर्तता करतो तसेच आपल्या या मागण्या ज्या आहे त्यासाठी राज्यस्तरावर शिफारशीसह पाठवतो असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे स्वतः खेळाडू असल्याने निश्चितच ते त्वरित निर्णय घेतील असे पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे.
निवेदनावर स्वाक्षऱ्या
व्हॉलीबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील व रवींद्र कंखरे, फुटबॉल चे जफर शेख व इम्तियाज शेख,हॉकी महाराष्ट्राच्या प्रो डॉ अनिता कोल्हे व हॉकी जळगाव च्या प्रा डॉ शमा सराफ, ताहेर शेख, बुद्धिबळाच्या श्रीमती अडव्होकेट कुलकर्णी व प्रवीण ठाकरे, तायक्वांदो चे अजित घार्गे, जलतरण च्या अध्यक्षा सौ रेवती नगरकर,प्रशिक्षक अब्दुल मोहसीन,लियाकत अली,संजय पाटील,कु श्वेता कोळी,वाल्मिक पाटील, समीर शेख,कासार फझल,मुझफ्फर खान, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत















