धरणगाव (प्रतिनिधी) दि.५ फेब्रुवारी,२०२१ रोजी प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान) तर्फे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. अशोक बिऱ्हाडे यांना प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात ४३ मागण्यांपैकी काही प्रामुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत १) डिसीपीएस / एनपीएस योजना रद्द करुन जुनी पेन्शन लागू करा. २) ३० वर्ष सेवा आणि ५०/५५ वर्ष वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून सक्तीने निवृत्त करण्याचे संविधान विरोधी धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे. ३) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅज्युटिची मर्यादा वाढून २५ लाख रू. करण्यात यावी. ४) महाराष्ट्रातील खाजगी संस्थामधील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच वेतन, महागाई व इतर भत्ते देणाऱ्या पूर्वीच्या कायद्यात बदल करु नये. असे अनेक महत्त्वपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भातील समस्यांच व शिफारशींचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी प्रोटान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, कार्याध्यक्ष सतीश शिंदे, उपाध्यक्ष पी.डी.कोळी, प्रोटान चे सचिव हर्षल चौधरी, विजय पाटील, फिलीप गावित, प्रविण पाटील, आदर्श चे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, तुषार नाईक, महात्मा फुले हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे, सी. एम. भोळे, जे.एस.पवार, हेमंत माळी, व्ही.टी.माळी, पी.डी. पाटील, जे.एस.महाजन, प्रमोद बडगुजर, जीवन भोई तसेच धरणगाव तालुक्यातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.