जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अजिंठा चौफुली येथील हॉटेल महिंद्रा येथे राहून एकाने हॉटेल मालकाची १ लाख ८९ हजार ५९० रुपयांत फसणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात मयुर अशोक जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात तजेंद्रसिंग अमितसिंग महिंद्रा (वय ६५ रा. जुनी जैन कंपनी, निमखेडी रोड, जुना हायवे रोड जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ फेब्रुवारी २०२२ पासून ते दि. १६ एप्रिल २०२२ रोजी पावेतो मयुर अशोक जाधव, (रा- प्लॅट नं. ०४, श्रीगणेश आर्किड, गंगापुररोड, रामेश्वरनगर, आनंदवल्ली, नासिक) याने तजेंद्रसिंग यांच्या अजिंठाचौफुली, जळगाव येथील हॉटेल महेंद्रामध्ये येऊन तोलिंकक्वॉलीटीसोल्युशन (आय) सेक्टरनं. प्रा.लिमी., वासुकमलबिजनेसस्पेस, ८५/२ ए/४, पहिलामजला, गणराजस्क्वेअर, बाणेर, पुणे याकंपनीत मॅनेजर म्हणुन कामास आहे. सदर कंपनीत मोठ्याहुद्यावर असल्याची बतावणी केली. तसेच तजेंद्रसिंग यांचा विश्वास संपादन करुन, हॉटेल मध्ये राहुन, हॉटेलमध्ये जेवण खावन करुन त्यापोटी हॉटेलचे बाकी असलेले बिल १,८९,५९० रुक्कम न देता परस्पर हॉटेलची रुम सोडुन निघुन जाउन विश्वासघात करुन फसवणुक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात मयुर अशोक जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास PN ईम्रान सैय्यद हे करीत आहेत.