डोंबिवली (वृत्तसंस्था) जन्मदाता पिता आणि रक्षणकर्त्या भावानेच १६ वर्षीय मुलीवर अत्याचार (Minor girl sexual assault) केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या (Kolsewadi police station) हद्दीत ही घटना घडली. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडिल आणि भावावर (culprit arrested) पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल (Pocso act) करीत त्यांना शनिवारी अटक केली.
मुळची युपी येथे राहणारी पीडित मुलगी कल्याणमध्ये वडिल आणि भावासोबत राहते. मुलीची आई आणि दोन बहिणी युपी येथे गावी रहातात. दोन महिन्यांपूर्वीच आई गावी रहाण्यास गेली आहे. पीडित मुलीने शुक्रवारी काही मुलांना चहा करुन दिला या कारणावरुन तिच्यात आणि वडिलांमध्ये वाद झाला. या वादातून वडिलांनी तिला कपडे काढून मारहाण केली. ही मारहाण झाल्यानंतर पीडित मुलगी परिसरातील काही जागरुक नागरिकांकडे गेली आणि वडिलांच्या मारहाणीची माहिती तिने त्यांना सांगितली.
नागरिकांनी पीडित मुलीला घेऊन त्वरीत कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले असता पोलिसांनी विचारणा केल्यावर पीडित मुलीने गेल्या पाच सहा महिन्यांपासून वडिल तिच्याशी अश्लील वर्तन करीत असल्याचे सांगितले. तसेच भावानेही तिच्याशी गैरवर्तन केल्याचे तिने सांगितले. मुलीच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात वडिल आणि भावाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना शनिवारी अटक केली आहे. याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली.