यावल (प्रतिनिधी) कोरपावली येथे डी. एच. जैन विद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि संस्थाचालकांनी त्वरित लक्ष देऊन येत्या २ दिवसात उपाययोजना करून समस्या सोडवावी. अन्यथा मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी दिला आहे.