अमळनेर (प्रतिनिधी) शहरात गुरुवारी दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर रात्री दगडफेकीत झाले. रात्री १० च्या सुमारास शहरात चार ठिकाणी दगडफेक करण्यात आली. यात दोन पोलिस जखमी झाल्याचे कळते.
शहरात रात्री दहा वाजेच्या सुमारास भोईवाडा, मण्यार मोहल्ला, कासार गल्ली, दारू मोहल्ला भागात दोन गटात दगडफेक झाली. डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे.